सैराटमधला इनामदार वाडा पाण्याखाली

नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट चित्रपटातील हा वाडा तुम्हाला आठवतो का? याच ठिकाणी आर्ची आणि परश्या यांचे निरागस प्रेम फुलले होते. 

Updated: Aug 9, 2016, 09:38 AM IST
 सैराटमधला इनामदार वाडा पाण्याखाली title=

मुंबई : नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट चित्रपटातील हा वाडा तुम्हाला आठवतो का? याच ठिकाणी आर्ची आणि परश्या यांचे निरागस प्रेम फुलले होते. 

मात्र आता हा वाडा पाण्याखाली. उजनी धरणातील पाणीसाठा वाढल्याने हा वाडा पाण्याखाली गेलाय.

सैराट सिनेमाने प्रेक्षकांने याड लावल्यानंतर ज्या ठिकाणी या सिनेमाचे शूटिंग झाले होते त्याठिकाणी प्रेक्षकांची मोठी गर्दी होत होती. इनामदार वाड्याचाही यात समावेश होता. 

सैराट प्रदर्शित झाल्यानंतर या वाड्याला भेट देणाऱ्यांची संख्याही वाढली होती. मात्र उजनी पात्रातील हा वाडा आता पाण्याखाली गेलाय.