मिसेस मुख्यमंत्री आता नव्या ग्लॅमर अंदाजात

मिसेस मुख्यमंत्री अर्थात देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी सौ. अमृता या आता नव्या ग्लॅमरस अंदाजात आपल्याला दिसणार आहे. बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांच्यासोबत  'म्युझिक व्हिडीओ'मध्ये झळकणार आहेत.

Updated: Nov 30, 2016, 09:39 AM IST
मिसेस मुख्यमंत्री आता नव्या ग्लॅमर अंदाजात title=

मुंबई : मिसेस मुख्यमंत्री अर्थात देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी सौ. अमृता या आता नव्या ग्लॅमरस अंदाजात आपल्याला दिसणार आहे. बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांच्यासोबत  'म्युझिक व्हिडीओ'मध्ये झळकणार आहेत.

 सौ. अमृता फडणवीस या मुलींच्या शिक्षणाबद्दल जागृती करण्यासाठी 'न्यूयॉर्क फॅशन वीक'मध्ये रॅम्पवॉक करताना दिसल्यात. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी यापेक्षा स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न सौ. अमृता फडवणीस यांनी केले आहे. त्यांचे वेगळे व्यक्तीमत्व दिसून येत आहे. 

त्याच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा आणखी एक नवा पैलू समोर आलाय. त्या ग्लॅमरस अंदाजात दिसणार आहेत अमिताभ बच्चन यांच्यासोबत. त्यांचा लवकरच 'म्युझिक व्हिडीओ' येणार आहे. त्यामध्ये त्या हटके दिसणार आहेत. याबाबत एका इंग्रजीवृत्तपत्राने वृत्त दिलेय.