शाहरुखचा मुलगा, अमिताभची नात आणि एक एमएमएस

सध्या सोशल मीडियावर शाहरुख खानचा मुलगा आर्यन आणि अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली या दोघांचा एमएमएस भलताच चर्चेत आहे. पण, या व्हिडिओची पोल खोल झालीय. 

Updated: Oct 7, 2014, 01:40 PM IST
शाहरुखचा मुलगा, अमिताभची नात आणि एक एमएमएस  title=

नवी दिल्ली : सध्या सोशल मीडियावर शाहरुख खानचा मुलगा आर्यन आणि अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली या दोघांचा एमएमएस भलताच चर्चेत आहे. पण, या व्हिडिओची पोल खोल झालीय. 

या अश्लील एमएमएसमध्ये जो मुलगा आहे तो किंग खानचा मुलगा आर्यन तर व्हिडिओत दिसणारी मुलगी अमिताभची नात नव्या नवेलीसारखी दिसतेय. गेल्या चार दिवसांपासून हा एमएमएस व्हायरल होताना दिसतोय. 

पण, हा व्हिडिओ केवळ बॉलिवूडच्या या दोन कुटुंबीयांना बदनाम करण्यासाठी बनवण्यात आल्याचं दिसतंय. 

नुकतंच नव्या आणि आर्यन या दोघांना लंडनच्या एका नाईटक्लबमध्ये पाहिलं गेलं होतं. तेव्हापासून मीडियाचं लक्षही त्यांच्याकडे वळलं होतं... नवंनव्या अफवा लगेचच या दोघांशी जोडल्या गेल्या होत्या.

संबंधित व्हिडिओ क्लिप पाहून हा व्हिडिओ एडीट केल्याचं लक्षात येतंय. सध्या बाजारात असे अनेक सॉफ्टवेअर आहेत ज्यांच्या मदतीनं एखाद्या व्यक्तिचा फोटो किंवा व्हिडिओ सहज एडिट करून त्यावर छेडछाड केली जाऊ शकते. याच सॉफ्टवेअरचा वापर काही सेलिब्रिटीजची इमेज बिघडवण्यासाठी केला जातो. 

आर्यन आणि नव्या नवेली या दोघांच्या कुटुंबीयांनी अद्याप या प्रकरणाबद्दल कोणताही खुलासा केलेला नाही. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.