डिस्को डान्सर मिथुन चक्रवर्तीची प्रकृती बिघडली

बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना अमेरिकेतील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 66 वर्षीय मिथून यांना पाठदुखीचा त्रास असल्यामुळे ते रुग्णालयात दाखल झाले आहेत. 

Updated: Oct 14, 2016, 07:16 AM IST
डिस्को डान्सर मिथुन चक्रवर्तीची प्रकृती बिघडली title=

नवी दिल्ली : बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना अमेरिकेतील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 66 वर्षीय मिथुन यांना पाठदुखीचा त्रास असल्यामुळे ते रुग्णालयात दाखल झाले आहेत. 
 
2009 साली इमरान खान आणि श्रुती हासन स्टारर 'लक' फिल्म चित्रपटाच्यावेळी एका अ‍ॅक्शन सीन करताना त्यांच्या पाठीला मार लागला होता. त्या दुखापतीने आता पुन्हा डोकं वर काढलं आहे. 

डिस्को डान्सर म्हणून ओळखले जाणारे मिथून लक चित्रपटानंतर मोठ्या पडद्यापासून काहीसे दूर होते. गेल्या वर्षी छोट्या पडद्यावर डान्स इंडिया डान्स या झी टीव्हीवरील शो चे परीक्षक म्हणून त्यांनी काम पाहिलं होतं. पण सध्या ते अमेरिकामध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. डॉक्टरांनी त्यांना आराम करायला सांगितला आहे.