नवी दिल्ली : ‘यशराज’बॅनर अंतर्गत निर्माण करण्यात आलेला ‘मर्दानी’ हा चित्रपट पाकिस्तानातात प्रदर्शित न करण्याचा निर्णय निर्णात्यांनी घेतलाय.
अभिनेत्री राणी मुखर्जीची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट शुक्रवारी भारतात ‘ए’ प्रमाणपत्रानुसार प्रदर्शित झालाय.
सिनेमाच्या एका प्रवक्त्यानं दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तान सिनेमा प्रमाणित बोर्डानं हा चित्रपट पाहिल्यानंतर, काही अटींवर या चित्रपटला ‘ए’ प्रमाणपत्र देण्यात येईल असं म्हटलंय.
यासाठी, या चित्रपटातील सात दृश्यांना कात्री लावण्याची तसंच काही दृश्यं ‘ब्लर’ करण्याची अट यावेळी ‘मर्दानी’च्या निर्मात्यांना घालण्यात आली.
परंतु, चित्रपटाच्या क्रिएटीव्ह टीमला मात्र हे मान्य नव्हतं. मूळ कथेलाच यामुळे धक्का लागू शकतो, असं क्रिएटीव्ह टीमचं मत होतं.
त्यामुळे, निर्मात्यांनी क्रिएटीव्ह टीमचं म्हणणं मान्य करत हा सिनेमा पाकिस्तानात प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.