मराठी चित्रपट 'कोर्ट' ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर

'डॉ.प्रकाश बाबा आमटे द रिअल हिरो' या मराठी सिनेमाच्या प्रचंड यशानंतर समृध्दी पोरे दिग्दर्शित हिंदी सिनेमा 'हेमलकसा' ने थेट ऑस्करच्या अंतिम फेरीपर्यंत धडक मारली आहे..मात्र मराठी सिनेमा कोर्ट ऑस्करच्या स्पर्धेतून बाहेर गेला आहे..

Updated: Dec 17, 2015, 02:59 PM IST
मराठी चित्रपट 'कोर्ट' ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर title=

मुंबई : 'डॉ.प्रकाश बाबा आमटे द रिअल हिरो' या मराठी सिनेमाच्या प्रचंड यशानंतर समृध्दी पोरे दिग्दर्शित हिंदी सिनेमा 'हेमलकसा' ने थेट ऑस्करच्या अंतिम फेरीपर्यंत धडक मारली आहे..मात्र मराठी सिनेमा कोर्ट ऑस्करच्या स्पर्धेतून बाहेर गेला आहे..

लॉस एंजिलिसमध्ये मागच्या महिन्यात सिनेमाचे ज्युरींसाठी अनेक शो झाले त्यात हेमलकसा ऑस्करच्या अंतिम फेरीमध्ये जाण्यावर शिक्काबोर्तब झाले. ८८व्या अॅकेडमी अॅवार्डस फॉरेन लॅंग्वेज कॅटेगिरीमध्ये कोर्ट (मराठी), तर ओपन कॅटेगिरीमध्ये हेमलकसा (हिंदी), नाचोमिया कुम पसार ( कोकणी फिल्म), जलम (मल्याळम) आमि रंगी तरंग (कन्नड) या पाच सिनेमांची निवड करण्यात आली होती. 

भारतातुन पाठवण्यात आलेला कोर्ट चित्रपट स्पर्धेतून बाद झाला असला तरी शेवटपर्यंत टिकून राहण्याचा मान हेमलकसा या एकमेव हिंदी सिनेमाने पटकाविला...