मुंबई : नुकताच फरहान अख्तर आणि त्याची पत्नी अधुना यांनी घेतलेला घटस्फोटाच्या निर्णयानं अनेकांना धक्का दिला... त्यातच रणबीर कतरिनाचं ब्रेक अप आणि आता अरबाज-मलाईका हे आणखीन एक 'पॉवर कपल' घटस्फोटाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलेलं समजतंय.
पण, हा घटस्फोट का होतोय? यामागे वेगवेगळ्या चर्चा रंगल्यात. spotboye.com मध्ये छापलेल्या एका बातमीनुसार, मलाईका ब्रिटनच्या एका बिझनेसमनला डेट करतेय आणि त्यामुळे या दोघांत दुरावा वाढल्याचं सांगण्यात आलंय.
याआधीही मलाईकाचं नाव अभिनेता अर्जुन कपूर याच्याशीही जोडण्यात येत होतं. ४२ वर्षीय मलाईका आणि ४८ वर्षीय अरबाझ खान या जोडप्याला अरहान नावाचा एक मुलगा आहे. पण, सध्या या दोघांमध्ये दुरावा इतका वाढलाय की घटस्फोट हाच मार्ग दिसतोय.
बातमीत केलेल्या उल्लेखानुसार, मलाईकानं काही महिन्यांपूर्वीच बांद्रास्थित आपलं घर सोडलंय. आपल्या मुलांना घेऊन ती खारमध्ये असलेल्या एका नवीन अपार्टमेन्टमध्ये शिफ्ट झालीय. हा अपार्टमेंट मलाईकाची बहि