अरबाज खान-मलायका अरोरा खान घेणार घटस्फोट ?

बॉलीवूडमध्ये घटस्फोटांची मालिका सुरूच आहे.

Updated: Jan 29, 2016, 09:54 PM IST
अरबाज खान-मलायका अरोरा खान घेणार घटस्फोट ? title=

मुंबई : बॉलीवूडमध्ये घटस्फोटांची मालिका सुरूच आहे. हृतिक रोशन- सुझेन खान, फरहान अख्तर- अधुना अख्तर यांच्या घटस्फोटानंतर आता अरबाज खान आणि मलायका अरोरा खानही घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. अरबाज आणि मलायका लवकरच घटस्फोटासाठीची प्रक्रिया सुरु करणार असल्याचं बोललं जात आहे.

मागच्या वर्षी ऑक्टोबरमध्ये मलायका खारमध्ये वेगळी राहायला लागली, तेव्हापासून अरबाज आणि मलायका वेगळे होणार या चर्चा सुरु झाल्या होत्या. मागच्या महिन्यामध्ये सलमानच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्येही या दोघांनी एकमेकांपासून लांब राहणं पसंत केलं.