LYRICS : प्रियांकाच्या 'बाबा' गाण्यातील आर्त हाक!

वडिलांना समर्पित केलेलं एक मराठी गाणं... तेही सध्या हॉलिवूड गाजवत असलेल्या प्रियांका चोप्राच्या आवाजात... या गाण्याची भुरळ प्रेक्षकांना न पडली तोच नवल... 

Updated: Nov 3, 2016, 07:57 PM IST
LYRICS : प्रियांकाच्या 'बाबा' गाण्यातील आर्त हाक! title=

मुंबई : वडिलांना समर्पित केलेलं एक मराठी गाणं... तेही सध्या हॉलिवूड गाजवत असलेल्या प्रियांका चोप्राच्या आवाजात... या गाण्याची भुरळ प्रेक्षकांना न पडली तोच नवल... 

हॉस्पीटलमध्ये मृत्यूशी झुंज देणाऱ्या वडिलांना आर्त हाक मारणाऱ्या त्याच्या बाळाचे हे शब्द... प्रियांकानंही हा क्षण अनुभवलाय... त्यामुळे तिच्या आवाजात हे गाणं ऐकणं हा प्रेक्षकांसाठीही सुखद अनुभव ठरतोय.

याच गाण्याचे शब्द खास प्रेक्षकांसाठी...

बाबा मला कळलेच नाही,
तुझ्या मनी वेदना.
कशी मी राहू?
बोल कुठे जाऊ?
मला काही समजेना

साद ही घालते लाडकी तुला
जगण्यात तू दिला,
माझ्या जिवा अर्थ खरा

बाबा! थांब ना रे तू
बाबा! जाऊ नको दूर.
बाबा! थांब ना रे तू.
बाबा!

दैव होता तू,
देव होता तू,
खेळण्यातला माझा खेळ होता तू.
शहानी होते मी,
वेडा होता तू.
माझ्यासाठी का रे,
सारा खर्च केला तू?

आज तू फेडू दे,
पांग हे मला.
जगण्या रे मला,
अजूनही तूच हवा.

बाबा! थांब ना रे तू
बाबा! जाऊ नको दूर.
बाबा! थांब ना रे तू.
 
पाय हे भिजले,
अश्रुंच्या उन्हात.
हाक दे, हात दे,
श्वास दे पुन्हा.

बाबा बोल ना! (5 वेळा)

बाबा! थांब ना रे तू
बाबा! जाऊ नको दूर.
बाबा! थांब ना रे तू.