लूलियानं सलमानला दिलं एक खास 'बर्थ डे' गिफ्ट...

सलमान खानची गर्लफ्रेंड लूलिया वंतूर हीनं सलमानचा वाढदिवस आणखीनच खास बनवलाय. लूलियानं सलमानला एक खास 'सरप्राईज' गिफ्ट दिलंय. 

Updated: Dec 29, 2015, 03:46 PM IST
लूलियानं सलमानला दिलं एक खास 'बर्थ डे' गिफ्ट...  title=

नवी दिल्ली : सलमान खानची गर्लफ्रेंड लूलिया वंतूर हीनं सलमानचा वाढदिवस आणखीनच खास बनवलाय. लूलियानं सलमानला एक खास 'सरप्राईज' गिफ्ट दिलंय. 

नुकताच सलमाननं आपला ५० वा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा केलाय. लूलियानं सलमानसाठी त्याच्याच 'बॉडीगार्ड' या सिनेमाचं एक गाणं गायलंय... तेही रोमानियन भाषेत... आता ही भाषा ती स्वत:च सलमानला समजावून सांगणार हे वेगळं सांगायला नको...

लूलियानं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपल्या कुटुंबीयांसोबत एक व्हिडिओ कॉलिंग करताना एक व्हिडिओ शेअर केलाय. यामध्ये लूलिया 'तेरी मेरी... मेरी तेरी' गाणं रोमानियन व्हर्जनमध्ये गाताना दिसतेय. लूलिया शनिवारी रात्री पनवेलमध्ये सलमानचा वाढदिवस सेलिब्रेट करण्यासाठीही उपस्थित होती. 

Merry Christmas!!! Hearts full of love and happiness for all

A video posted by Iulia Vantur Official Account (@vanturiulia) on