लुधियानात आमीरची मकर संक्रांती सेलिब्रेशनची 'दंगल'

बॉलीवूड सुपरस्टार आमीर खानने लुधियानात ‘दंगल’च्या सेटवर मकरसंक्रांतीचे सेलिब्रेशन केले. एका घराच्या छतावर जाऊन आमीरने यावेळी ‘दंगल’ चित्रपटाच्या कर्मचाऱयांसोबत पंतग उडविण्याचा आनंद लुटला. ‘दंगल’च्या चित्रीकरणासाठी आमीर गेल्या काही महिन्यांपासून पंजाबमध्येच वास्तव्याला आहे. 

Updated: Jan 14, 2016, 09:55 PM IST
लुधियानात आमीरची मकर संक्रांती सेलिब्रेशनची 'दंगल' title=

मुंबई : बॉलीवूड सुपरस्टार आमीर खानने लुधियानात ‘दंगल’च्या सेटवर मकरसंक्रांतीचे सेलिब्रेशन केले. एका घराच्या छतावर जाऊन आमीरने यावेळी ‘दंगल’ चित्रपटाच्या कर्मचाऱयांसोबत पंतग उडविण्याचा आनंद लुटला. ‘दंगल’च्या चित्रीकरणासाठी आमीर गेल्या काही महिन्यांपासून पंजाबमध्येच वास्तव्याला आहे. 

आपल्या चाहत्यांना आमीरने सोशल मीडिया अकाऊंटवरून मकर संक्रांत आणि लोहरी सणाच्या शुभेच्छा दिल्या. लहानपणाचा आनंद पुन्हा एकदा अनुभवता आल्याचे आमीरने यावेळी म्हटले. 

दंगलच्या सेटवर येथील स्थानिकांनी आम्हाला मकर संक्रांतीनिमित्ताने गोडाधोडाचे पदार्थ सेटवर खाऊ घातले आणि आम्ही पतंग उडविण्याचाही आनंद लुटला. चित्रीकरण सुरूच आहे पण पंजाबमध्ये साजरा केलेला हा सण नेहमी आठवणीत राहील, असे दंगलचे दिग्दर्शक नितेश तिवारी यांनी सांगितलं. दरम्यान, प्रख्यात कुस्तीपटू महावीरसिंग फोगट यांच्या चरित्रपट अर्थात ‘दंगल’ चित्रपटाचे चित्रीकरण सध्या दुसऱया टप्प्यात आहे.