एलईडी बल्बच्या किंमती घटून ४४ रूपयांवर येतील : पीयूष गोयल

उर्जा संरक्षणाला चालना देण्यासाठी घरगुती लायटिंग योजना अंतर्गत तीन कोटी एलईडी बल्बचे वितरण केल्यानंतर आता उर्जा मंत्री पियूष गोयल यांनी एलईडी बल्बची किंमत कमी होतील असे संकेत दिले आहे.  

Updated: Nov 26, 2015, 08:46 PM IST
एलईडी बल्बच्या किंमती घटून ४४ रूपयांवर येतील : पीयूष गोयल  title=

नवी दिल्ली : उर्जा संरक्षणाला चालना देण्यासाठी घरगुती लायटिंग योजना अंतर्गत तीन कोटी एलईडी बल्बचे वितरण केल्यानंतर आता उर्जा मंत्री पियूष गोयल यांनी एलईडी बल्बची किंमत कमी होतील असे संकेत दिले आहे.  

आगामी काळात एलईडी बल्बची किंमत ४४ रूपयांपर्यंत कमी होणार आहे. 

७५ टक्के स्वस्त झाले एलईडी बल्ब 

गोयल यांनी सांगितले की, आम्ही मेक इन इंडिया अभियानाला प्रोत्साहन देत आहे. आम्ही एलईडीची किंमत ४४ रूपयांपर्यंत कमी करणार आहोत. सुरूवातीला मी सहज म्हटले होते. आता आमचे हे लक्ष्य असणार आहे. 

सार्वजनिक क्षेत्रात एलईडी बल्ब ७३ रुपयांत खरेदी केले. २०१४ मध्ये ही किंमत ३१० रुपये होती. यात ७५ टक्के घट झाली आहे. 

कमी होणार किरकोळ किंमती
गोयल यांनी लाइटिंग उद्योगात प्रतिनिधींनी एलईडीच्या किरकोळ किंमती कमी करण्यास सांगितले आहे. आता ही किंमत ३०० रुपयांच्या आसपास आहे. 

सहा राज्यात योजना लागू होणार 
कमी किंमती एलईडी मिळण्याची योजना सहा राज्यात राबविण्यात येणार आहे. त्यात महाराष्ट्र, राजस्थान, दिल्ली, उत्तर प्रदेश, आंध्रप्रदेश आणि हिमाचल प्रदेशमध्ये राबविण्यात येणार आहे.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.