'पोश्टर गर्ल'मधील लावणी, "कशाला लावताय वाट?'

पोश्टर गर्ल सिनेमातील एक दमदार लावणी रिलीज.

Updated: Feb 3, 2016, 04:40 PM IST
'पोश्टर गर्ल'मधील लावणी, "कशाला लावताय वाट?' title=

मुंबई : आवाज वाढवं डीजे तुला आईची शपथ हाय, या गाण्यानंतर पोश्टर गर्ल सिनेमातील एक दमदार लावणी रिलीज झाली आहे. (लावणीचा व्हिडीओ पाहा सर्वात खाली ) 

गुरू ठाकूर यांनी ही लावणी लिहिली आहे. अमितराज यांनी संगीत दिलीय, म्हणून ही लावणी मराठीतील मागील अनेक लावण्यांना तोडीस तोड आहे. 

आवाज वाढवं डीजे या गाण्या एवढीच ही लावणीही हिट होणार आहे. प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल अशी ही लावणी आज यू-ट्यूबवर रिलीज करण्यात आली आहे. 

गायिका बेला शेंडे यांनी ही लावणी गायलेली आहे. ही लावणी ऐकण्यासारखी आहे, संगीताचा आनंद घेण्यासारखी आहे, तर नक्की ऐका, 'कशा लावताय वाट?'