लता मंगेशकर एक सो कॉल्ड सिंगर- न्यू यॉर्क टाइम्स

 AIB च्या व्हिडिओमध्ये भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर यांच्यावर अश्लिल भाषेमध्ये विडंबन करण्यात आलं आहे. संपूर्ण भारतात या व्हिडिओमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. त्यांचे फॅन्स, बॉलिवूडपासून अगदी राजकरण्य़ांनी देखील याला विरोध केला.  

Updated: Jun 1, 2016, 02:08 PM IST
लता मंगेशकर एक सो कॉल्ड सिंगर- न्यू यॉर्क टाइम्स title=

मुंबई :  AIB च्या व्हिडिओमध्ये भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर यांच्यावर अश्लिल भाषेमध्ये विडंबन करण्यात आलं आहे. संपूर्ण भारतात या व्हिडिओमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. त्यांचे फॅन्स, बॉलिवूडपासून अगदी राजकरण्य़ांनी देखील याला विरोध केला.  
हे काही कमी नव्हते तर त्यात भर पाडायला आता न्यू यॉर्क टाइम्सने (अमेरिकेतील एक वृत्तपत्र) या बातमीचा रिपोर्ट करतांना लता दीदी या एक ' सो कॉल्ड सिंगर' आहेत असे लिहिले.

१९४० पासून संगीत क्षेत्रात आपला ठसा उमटवण्याऱ्या लता मंगेशकरांविषयी असे उद्गार काढणे ही एक आश्चर्यदायक बाब आहे.

सचिन आणि लता दीदींचे फॅन्स, फॉलोअर्स, क्रिकेटमधील दिग्गजांपासून सर्वांनी या व्हिडिओची टीका केली. लता दीदी आणि सचिनचे फॅन्स अजूनही या गोष्टींवर रिअॅक्ट होत आहेत आणि अजूनही या गोष्टींमधून बाहेर आलेले नसतांना आता ते न्यू यॉर्क टाइम्सच्या या रिपोर्टला कसे प्रतिक्रिया देणारेत हेच आता पाहायचे.