बहुप्रतिक्षित 'लय भारी'चा प्रदर्शनाचा मार्ग मोकळा

रितेश देशमुखचा लय भारी या मराठी चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. 

Updated: Jul 3, 2014, 03:32 PM IST
बहुप्रतिक्षित 'लय भारी'चा प्रदर्शनाचा मार्ग मोकळा title=

मुंबई : रितेश देशमुखचा लय भारी या मराठी चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. 

या चित्रपटाविरोधात केलेली कॉपी राईटसंदर्भातली याचिका हायकोर्टानं फेटाळून लावली आहे. त्यामुळं ठरल्याप्रमाणे ११ जुलैलाच हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

चकमकफेम मुंबईचे माजी पोलीस अधिकारी सचिन वाजे यांनी कॉपी राईट कायद्याचा भंग होत असल्याचा आरोप केला आहे.

लय भारीच्या निर्मात्यांविरोधात याचिका करून प्रदर्शन रोखण्याची मागणी केली होती. 

तसेच पाच कोटी रुपयांचा दावाही केला होता. मात्र कोर्टानं ही याचिका फेटाळून लावल्यानं आता चित्रपट प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झालाय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.