'क्या कूल है हम ३'ला पहिल्या दिवशी चांगली ओपनिंग

आज बॉक्स ऑफिसवर अक्षय कुमारचा एअरलिफ्ट आणि क्या कूल है हम ३ हे दोन बिग बजेट सिनेमे रिलीज झालेत. क्या कूल है हम च्या ट्रेलर आणि गाण्यांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. त्याप्रमाणेच पहिल्या दिवशी क्या कूल है हम ३ ला चांगली ओपनिंग मिळालीये. 

Updated: Jan 22, 2016, 01:24 PM IST
'क्या कूल है हम ३'ला पहिल्या दिवशी चांगली ओपनिंग title=

मुंबई : आज बॉक्स ऑफिसवर अक्षय कुमारचा एअरलिफ्ट आणि क्या कूल है हम ३ हे दोन बिग बजेट सिनेमे रिलीज झालेत. क्या कूल है हम च्या ट्रेलर आणि गाण्यांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. त्याप्रमाणेच पहिल्या दिवशी क्या कूल है हम ३ ला चांगली ओपनिंग मिळालीये. 

 

एअरलिफ्ट आणि क्या कूल है हम३ या दोन्ही चित्रपटांना कमी-अधिक प्रमाणात पहिल्या दिवशी सारखीच गर्दी मिळतेय. मात्र सकाळच्या शोमध्ये 'क्या कूल है हम 3' ला एअरलिफ्टच्या तुलनेत अधिक प्रतिसाद मिळालेला दिसला.

 

एअरलिफ्ट हा सिनेमा १९९० साली घडलेल्या एका सत्य घटनेवर आधारीत आहे. कुवैत आणि इराक युद्धादरम्यान १,७०,००० भारतीयांना सुरक्षितपणे बाहेर कसं काढलं जात याची कथा एअरलिफ्टमध्ये मांडण्यात आलीये. तर दुसरीकडे क्या कूल है हम ३ केवळ पॉर्न कॉम चित्रपट आहे. यात सनी लिओन, तुषार कपूर, मंदना करिमी यांच्या भूमिका आहेत.