20 ऑगस्टपासून सुरू होणार 'Kick 2' चं शूटिंग

2009मध्ये रिलीज झालेला सुपरहिट तेलुगू चित्रपट ‘किक’चा सिक्वेल ‘किक 2’चं शूटिंग 20 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन सुरेंद्र रेड्डी करत आहेत. तर लीड रोलमध्ये रवी तेजा आहे. 

Updated: Aug 17, 2014, 05:58 PM IST
20 ऑगस्टपासून सुरू होणार 'Kick 2' चं शूटिंग title=

हैदराबाद: 2009मध्ये रिलीज झालेला सुपरहिट तेलुगू चित्रपट ‘किक’चा सिक्वेल ‘किक 2’चं शूटिंग 20 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन सुरेंद्र रेड्डी करत आहेत. तर लीड रोलमध्ये रवी तेजा आहे. 

सुरेंद्र रेड्डीनं चित्रपटाबद्दल माहिती देतांना सांगितलं, आम्ही बुधवारपासून “‘किक 2’चं शूटिंग सुरू करत आहोत. ही एक अॅक्शन फिल्म असेल, मात्र याचं पहिल्या भागाची काही साम्य नसेल”.

अभिनेता कल्याण राम आपल्या प्रॉडक्शन बॅनस एनटीआर आर्ट्स बॅनर अंतर्गत ही फिल्म बनवत आहेत. चित्रपटाला म्यूझिक थमचं आहे. नुकताच सलमानचा रिलीज झालेला चित्रपट ‘किक’ हा 2009मध्ये बनलेल्या याच तेलुगू चित्रपटाचा रिमेक आहे. 

त्यामुळं आगामी काळात पुन्हा सल्लू मियाँचा किक-2 ही आपल्याला पाहायला मिळायची शक्यता आहे.  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.