म्ंबईः शाहरूख आणि आमिर यांच्यातला वाद माध्यमांच्या चर्चेत जास्त येत नसला तरी या दोघांमधील शीतयुद्ध हे नेहमीच चालू असतं. शाहरुखचा आगामी चित्रपट हॅप्पी न्यू ईयरच्या संगिताच्या प्रकाशना दरम्यान चित्रपटाची पूर्ण टीम या वेळेस उपस्थित होती. या वेळेस पत्रकारांशी बोलतांना शाहरुखने पुन्हा एकदा आमिरचा पी.के या चित्रपटाच्या विवादित पोस्टरवर थट्टा उडवली आहे.
शाहरूखला जेव्हा पी.के पोस्टर बद्दल विचारलं गेलं तेव्हा शाहरुखने 'आता आम्ही ही बिना कपड्याचं पोस्टर बनवण्याचा विचार करतो आहे' असं म्हणत थट्टा केली आहे. शाहरुखने पुढे म्हंटल की 'मी कधी तुलनेवर विश्वास नाही करत, त्यांचा पोस्टर त्यांचा आहे आणि आमचा पोस्टर आमचा आहे. त्यांचा चित्रपट त्यांचा आहे आणि माझा चित्रपट माझा आहे.
आमच्यात कोणतीही स्पर्धा नाही स्पर्धा ही फक्त लोकांच्या डोक्यात आहे जे आम्हाला प्रतिस्पर्धींच्यां दृष्टीकोणातून बघतात. जर आमची तुलना करायची असेल तर आमच्या कामावरून करा जे आमच्यासाठीही चागंल राहील. मी आशा करतो की जो ही चित्रपट असो पींके असो किंवा किक् कोणताही असो त्याने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं पाहिजे.
शाहरुख आणि दिपिकाचा हॅप्पी न्यू ईयर हा आगामी चित्रपट येत्या दिवाळीत प्रदर्शित होणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.