झी मराठीवर सुरु होतेय 'खुलता कळी खुलेना' मालिका

झी मराठी वाहिनीवर लवकरच नवी मालिका सुरु होतेय. 'खुलता कळी खुलेना' असं या मालिकेचे नाव आहे. येत्या १८ जुलैपासून ही मालिका रात्री साडेआठ वाजता सुरु होत आहे. 

Updated: Jun 27, 2016, 11:49 AM IST
झी मराठीवर सुरु होतेय 'खुलता कळी खुलेना' मालिका title=

मुंबई : झी मराठी वाहिनीवर लवकरच नवी मालिका सुरु होतेय. 'खुलता कळी खुलेना' असं या मालिकेचे नाव आहे. येत्या १८ जुलैपासून ही मालिका रात्री साडेआठ वाजता सुरु होत आहे. 

प्रत्येक नात्याला नाव असतेच असे नाही. काही नाती अशी असतात ज्यांना नाव नसले तरी ती खूप महत्त्वाची असतात. या नात्याचे आपल्या जीवनात महत्त्व मोठे असते. 

याच संकल्पनेवर आधारित ही मालिका सुरु होतेय. यातील नवीन जोडीची केमिस्ट्री प्रेक्षकांना कितपत आवडते हे मालिका सुरु झाल्यावरच कळेल.