शु्क्रवारीच चित्रपट रिलीज का होतो?

आपल्या देशात कोणताही नवीन चित्रपट हा शुक्रवारी प्रदर्शित केला जातो. मात्र नवीन चित्रपट शुक्रवारीच का प्रदर्शित केला जातो याचे कारण तुम्हाला माहीत आहे का?...

Updated: Jun 27, 2016, 11:12 AM IST
शु्क्रवारीच चित्रपट रिलीज का होतो? title=

मुंबई : आपल्या देशात कोणताही नवीन चित्रपट हा शुक्रवारी प्रदर्शित केला जातो. मात्र नवीन चित्रपट शुक्रवारीच का प्रदर्शित केला जातो याचे कारण तुम्हाला माहीत आहे का?...

भारतात शुक्रवारी चित्रपट रिलीज कऱण्याची पद्धत १९५०च्या अखेरीस सुरु झाली. मुगल-ए-आजम हा सिनेमा ५ ऑगस्ट १९६०मध्ये शुक्रवारी रिलीज करण्यात आला होता. मुगल-ए-आजमला मिळालेले यश पाहता नवीन चित्रपट शुक्रवारी रिलीज करण्याची पद्धत सुरु झाली. 

त्याकाळी भारतात कलर टीव्ही नव्हता. त्यानंतरही चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित करण्यास सुरुवात झाली. तसेच अधिकाधिक लोकांनी चित्रपट पहावे यासाठी मुंबईतील कंपन्यांमध्ये शुक्रवारच्या दिवशी हाफ डे देण्यात येत असे. 

तसेच यामागे आणखी एक कारणही आहे. शनिवार आणि रविवार या दोन दिवसात कार्यालयांना तसेच शाळांना सुट्टी असते. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर कमाई चांगली व्हावी या उद्देशाने चित्रपट शुक्रवारी रिलीज करण्यात येत असे.