व्हॅलंटाईन डे ला कतरिना कोणसोबत ?

रणबीर कपूर आणि कतरिना कैफ यांच्यामध्ये ब्रेक अप झाल्याच्या चर्चा सध्या जोरदार सुरु आहेत.

Updated: Feb 7, 2016, 11:03 PM IST
व्हॅलंटाईन डे ला कतरिना कोणसोबत ? title=

मुंबई: रणबीर कपूर आणि कतरिना कैफ यांच्यामध्ये ब्रेक अप झाल्याच्या चर्चा सध्या जोरदार सुरु आहेत. पण यंदाच्या व्हॅलंटाईन डे ला रणबीर आणि कतरिना एकत्रच असतील असं बोललं जातंय. 

रणबिर आणि कतरिनाच्या जग्गा जासूस या चित्रपटाचं शूटिंग 13 फेब्रुवारीपासून सुरु होणर आहे, कतरिना कैफनंच याबाबत एका मुलाखतीमध्ये माहिती दिली आहे.

 

त्यामुळे 14 फेब्रुवारी म्हणजेच व्हॅलंटाईन डे ला कतरिना आणि रणबीर एकत्र तर असतील पण हे दोघं व्हॅलंटाईन डे साजरा करतील का ? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.