जगातील 'सर्वात सेक्सी जिवंत महिला' ठरली कतरीना!

बॉलिवूड अभिनेत्री कतरीना कैफला 'सर्वात सेक्सी जिवंत महिले'चा खिताब मिळालाय. एका राष्ट्रीय वृत्तपत्रानं घेतलेल्या यूथ सर्व्हे २०१४मध्ये लोकांनी कतरीनाला नंबर वन बनवलंय. हॉलिवूड स्टार एंजेलिना जोली आणि प्रसिद्ध पॉपस्टार बेयोंसेला पूर्ण ३७ मतांनी कतरीनानं मागे टाकलंय. 

Updated: Sep 2, 2014, 07:21 PM IST
जगातील 'सर्वात सेक्सी जिवंत महिला' ठरली कतरीना! title=

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री कतरीना कैफला 'सर्वात सेक्सी जिवंत महिले'चा खिताब मिळालाय. एका राष्ट्रीय वृत्तपत्रानं घेतलेल्या यूथ सर्व्हे २०१४मध्ये लोकांनी कतरीनाला नंबर वन बनवलंय. हॉलिवूड स्टार एंजेलिना जोली आणि प्रसिद्ध पॉपस्टार बेयोंसेला पूर्ण ३७ मतांनी कतरीनानं मागे टाकलंय. 

नुकत्याच एका मासिकानं कतरीनाला 'भारतातील सर्वात सुंदर महिले'चा खिताब दिला होता. याशिवाय सलग पाचव्यांदा कतरीना 'जगातील सर्वात सेक्सी महिला' बनलीय. 

ट्रस्ट रिसर्च अॅडव्हायझरीच्या एका सर्व्हेत पण कतरीना भारतातील सर्वात आकर्षक महिला निवडल्या गेली होती. देशातील १५ मोठ्या शहरांमध्ये केल्या गेलेल्या सर्व्हेत ककतरीनाला टॉप १०मध्ये जागा मिळाली. यापूर्वी हा सन्मान शाहरुख खान, अमिताभ बच्चन, महेंद्र सिंह धोनी आणि आमीर खानला मिळालाय. म्हणजे कतरीना बॉलिवूडची पहिली महिला अभिनेत्री आहे, जिनं यावर्षी हे टायटल मिळवलंय. 

गेल्या वर्षी कतरीनाला जगातील टॉप १० सेक्सी आशियाई महिलांच्या लिस्टमध्ये सहभागी केलं गेलंय. एकूणच बॉलिवूडपासून परदेशातही कतरीनाच्या सौंदर्याचा डंका वाजतोय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.