उशीर झाला म्हणून कतरीनानं सोडला 'त्याचा' हात!

अभिनेत्री कतरीना कैफ कुणीही उशीर केलेलं अजिबात खपवून घेत नाही... आणि याचमुळे तीनं आपल्याकडे गेल्या 11 वर्षांपासून कामावर असलेल्या 'मेकअपमन'ला हाकलून दिलंय. 

Updated: Jan 21, 2015, 02:16 PM IST
उशीर झाला म्हणून कतरीनानं सोडला 'त्याचा' हात! title=

मुंबई : अभिनेत्री कतरीना कैफ कुणीही उशीर केलेलं अजिबात खपवून घेत नाही... आणि याचमुळे तीनं आपल्याकडे गेल्या 11 वर्षांपासून कामावर असलेल्या 'मेकअपमन'ला हाकलून दिलंय. 

सुभाष नावाचा मेकअपमन सलमानफेम 'मैंने प्यार क्यों किया' या सिनेमापासून कतरीनाचा मेकअप करत होता. 

नुकतंच अनुराग बासू दिग्दर्शित एका सिनेमाच्या सेटवर पोहचण्यासाठी सुभाषला उशीर झाला. मग काय, कॅट मॅमचा पारा इतका चढला की सुभाषला तंबी देण्याऐवजी तिनं डायरेक्ट त्याला बाहेरचाच रस्ता दाखवला. 

एका मुलाखती दरम्यान, कतरीनानंच या बातमीला दुजोरा दिलाय. 'सुभाषला दुसरीकडे काम मिळालं होतं... आणि इकडे माझंही काम सुरू झालं होतं... अशावेळी त्याच्याऐवजी दुसऱ्या कुणाला तरी घेणं भाग होतं' असं स्पष्टीकरण कतरीनानं यावेळी दिलं. 

दरम्यान, कतरीनाच्या टीमच्या सदस्यांशी बोलताना त्यांनी, सुभाष एका स्टारसोबत काही दिवसांसाठी मॉरिशस गेला होता... आणि हवामान खराब असल्यामुळे त्याला उशीर झाला. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.