सैफची बायको करिना सध्या बिझी आहे तरी कशात?

करिना कपूरचं सध्या काय सुरू आहे ते कोणालाच कळत नाहीये . बहुतेक चित्रपटांमध्ये करिना फक्त पाहुण्या कलाकारची भूमिका साकारताना दिसतेय. नुकत्याच आलेल्या 'शौकीन' आणि 'हॅपी एंडिंग'मध्ये करीनानं पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती.

Updated: Dec 14, 2014, 04:34 PM IST
सैफची बायको करिना सध्या बिझी आहे तरी कशात? title=

मुंबई: करिना कपूरचं सध्या काय सुरू आहे ते कोणालाच कळत नाहीये . बहुतेक चित्रपटांमध्ये करिना फक्त पाहुण्या कलाकारची भूमिका साकारताना दिसतेय. नुकत्याच आलेल्या 'शौकीन' आणि 'हॅपी एंडिंग'मध्ये करीनानं पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती.

या आधी देखील 'दबंग'मध्येही फक्त एका गाण्यासाठीच करिनाचा सहभाग होता. आता सध्या चर्चा होत आहे, 'बदलापूर' आणि 'गब्बर' या सिनेमातल्या करिनाच्या भूमिकांची.

या  काही दोन-चार सिनेमात ती पाहुणी कलाकार म्हणूनच दिसणार आहे. तशी 'बजरंगी भाईजान'मध्ये तिची महत्त्वाची भूमिका आहे. पण तो चित्रपट सोडला तर बाकी चित्रपटात करिना पाहुणी कलाकार म्हणूनच दिसतायत. नक्की करिनाच्या आयुष्यात काय सुरू आहे हे कोणालाच कळत नाही? करिनाचे चाहते तिच्या कमबॅकची खूप आतुरतेनं वाट पाहत आहेत. ती केव्हा परत येईल हे तर तिचं तिलाच माहित. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.