मुंबई : बॉलिवूडची अभिनेत्री करिना कपूर ही आता वजन कमी करणाऱ्या एका औषधाच्या कंपनीवर खटला दाखल करणार असल्याचं समजतंय.
आपल्या परवानगीशिवाय या औषध कंपनीनं आपल्या नावाचा आणि फोटोचा वापर करत असल्याचा आरोप करीनानं या औषध कंपनीवर केलंय.
करिनानंही 'झिरो फिगर' बनवण्यासाठी या औषधाचा वापर केला होता, असं सांगून या औषधाची विक्री कंपनी करत असल्याचं करीनाला तिच्या चाहत्यांकडूनच समजलं होतं. काही दिवसांपूर्वी करिना अरब देशांच्या टूरवर गेली भेटलेल्या काही फॅन्सनी करीनाशी संवाद साधला होता. त्यामुळे, करिनानं आता त्या कंपनीवर खटला दाखल करण्याचा निर्णय घेतलाय. तसंच २० कोटी रुपयांच्या दंडाचा दावाही केलाय.
मिळालेल्या माहितीनुसार, करिना नेहमीच झिरो फिगरच्या विरोधात आहे. करिना आपलं वजन फक्त 'टशन' सिनेमासाठी कमी केलं होतं. तसेच करिनाने कधीही वजन कमी करण्यासाठी कोणतही औषध घेण्याचा सल्ला दिलेला नाही.
मी एक अभिनेत्री आहे आणि मी कधीही माझ्या फॅन्सना खोटा सल्ला देणार नाही. ही औषध उत्पादक कंपनी माझं नाव बेकायदेशीररित्या वापरत आहे. ज्यामुळे माझ्या फॅन्समध्ये गैरसमज निर्माण होत आहेत, असं करीनाचं म्हणणं आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.