...जेव्हा कपिलला धक्के मारत ऐश्वर्याच्या व्हॅनिटी व्हॅनच्या बाहेर फेकलं जातं!

ऐश्वर्या राय - बच्चन लवकरच आपल्या 'जज्बा' या सिनेमातून प्रदीर्घ काळानंतर प्रेक्षकांसमोर येतेय. नवीन सिनेमा येतोय म्हटल्यानंतर या सिनेमाचे स्टार्स 'कॉमेडी नाईटस विथ कपिल' या कार्यक्रमात येणार नाहीत, असं होणं दुर्मिळचं... 

Updated: Oct 1, 2015, 05:52 PM IST
...जेव्हा कपिलला धक्के मारत ऐश्वर्याच्या व्हॅनिटी व्हॅनच्या बाहेर फेकलं जातं! title=

मुंबई : ऐश्वर्या राय - बच्चन लवकरच आपल्या 'जज्बा' या सिनेमातून प्रदीर्घ काळानंतर प्रेक्षकांसमोर येतेय. नवीन सिनेमा येतोय म्हटल्यानंतर या सिनेमाचे स्टार्स 'कॉमेडी नाईटस विथ कपिल' या कार्यक्रमात येणार नाहीत, असं होणं दुर्मिळचं... 

बरोबर... ऐश्वर्याही कपिल शर्माच्या कार्यक्रमात प्रेक्षकांना दिसणार आहे. याच कार्यक्रमाचा एक छोटा टीझर सध्या दिसतोय. ऐश्वर्यासोबत इरफान खान आणि दिग्दर्शक संजय गुप्ता हेदेखील कॉमेडी नाईटसच्या सेटवर दिसणार आहेत.  

इरफान यापूर्वीही कपिलच्या कार्यक्रमात दिसला होता पण, ऐश्वर्या मात्र पहिल्यांदाच 'कॉमेडी नाईटस्'च्या सेटवर दिसणार आहे. ऐश्वर्याचा 'जज्बा' 9 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.