नवी दिल्ली : छोट्या पडद्यावर आपल्या अदाकारीनं धुमाकूळ उडवून देणारा कपिल शर्मा बऱ्याचदा हेडलाईन्समध्ये दिसतो... पण, कपिललाही राग येतो... आणि तो ही बॉलिवूडच्या देसी गर्ल प्रियांका चोप्रावर रागावू शकतो... हे नुकतंच लोकांनी पाहिलंय.
त्याचं झालं असं की, एका पुरस्कार सोहळ्यादरम्यान प्रियांकाला येण्यासाठी उशीर झाला होता... त्यामुळे, कपिलला एवढा राग आला की त्यानं माईक जमिनीवर भिरकावून दिला... आणि स्टेजवरून निघून गेला.
मुंबईमध्ये सुरु असलेल्या या पुरस्कार सोहळ्याला प्रियांका आणि कपिल होस्ट करत होते. याच दरम्यान प्रियांका मेकअप रुममद्ये निघून गेली... त्यानंतर पुन्हा स्टेजवर येण्यासाठी प्रियांकानं तीन तास घेतले. प्रियांकाची वाट बघता बघता कपिलचा पारा इतका चढला की 'पाहा, बायकांचा हाच प्रॉब्लेम असोत, मॅडम अजून तयार नाहीत' असं म्हणत त्यानं माईक जमिनीवर फेकला आणि तिथून तो निघून गेला.
उल्लेखनीय म्हणजे, गेल्या वर्षी जुलै महिन्यात याच कपिलनं अभिनेत्री कंगना रानौत हिला ताटकळत ठेवलं होतं. कंगना जेव्हा 'कॉमेडी नाईटस विथ कपिल'च्या सेटवर पोहचली तेव्हा ती कपिलची वाट पाहत बसली होती...
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.