सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्ष लीला सॅमसन यांचा राजीनामा

बाबा राम रहीम याच्या 'एमएसजी - मॅसेंजर ऑफ गॉड' या सिनेमाला परवानगी दिल्याचा निषेध करत  सेन्सॉर बोर्डच्या अध्यक्ष लीला सॅमसन यांनी राजीनामा देण्याची भूमिका घेतलीय. या सिनेमाला आपल्या अपरोक्ष मंजुरी मिळाल्याने त्या चांगल्याच संतापल्या आहेत.  

Updated: Jan 16, 2015, 09:07 AM IST
सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्ष लीला सॅमसन यांचा राजीनामा title=

मुंबई : बाबा राम रहीम याच्या 'एमएसजी - मॅसेंजर ऑफ गॉड' या सिनेमाला परवानगी दिल्याचा निषेध करत  सेन्सॉर बोर्डच्या अध्यक्ष लीला सॅमसन यांनी राजीनामा दिलाय. बोर्डाच्या सदस्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप करत त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. या सिनेमाला आपल्या अपरोक्ष मंजुरी मिळाल्याने त्या चांगल्याच संतापल्या आहेत.  

परवानगी मिळाल्यानं 'द मॅसेंजर ऑफ गॉ़ड' हा सिनेमा आता २३ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. गेल्या आठवड्यात १६ जानेवारी रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार होता... पण, सेन्सॉर बोर्डानं आक्षेप घेत याला 'एफसीएटी'कडे पाठवला होता. पण, या सिनेमाला आता हिरवा कंदील दाखवण्यात आलाय. 'आपली या सिनेमाला परवानगी नाही... या निर्णयात आपलं मत विचारात घेतलं नाही...' असा खळबळजनक आरोप सॅमसन यांनी केलाय. 

हस्तक्षेप, दबाव, पॅनल सदस्य आणि मंत्रालयाद्वारे नियुक्त केल्या जाणाऱ्या व्यवस्थापन अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार यांमुळे आपण पद सोडण्याचा निर्णय घेतल्याचं बोर्डाच्या अध्यक्ष लीला सॅमसन यांनी म्हटलंय. सॅमसन यांच्या म्हणण्यानुसार, आपल्याला एका अशा संघटनेचं व्यवस्थापन पाहावं लागतलंय ज्याची गेल्या नऊ महिन्यांपासून एकही बैठक झालेली नाही, कारण मंत्रालयाच्या सदस्यांकडे बैठकीला परवानगी देण्यासाठी फंड उपलब्ध नाही.... सेन्सॉर बोर्डाच्या सर्व  सदस्यांचा कार्यकाळ संपलेला आहे, पण नव्या सरकारननं नव्या बोर्डाची आणि अध्यक्षांची नियुक्त अजूनही केलेली नाही... आहेत त्याच सदस्यांचा कार्यकाळ वाढवत प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत काम सुरू ठेवण्याचं मंत्रालयाकडून सांगण्यात आलंय, असं लीला सॅमसन यांनी म्हटलंय.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.