'43 वर्षांच्या मुलासाठी त्याच्या वडिलांना का उभं राहावं लागतं?'

अभिनेत्री कंगना रणावत हृतिक रोशनबरोबर सुरु असलेला कोल्ड वॉर विसरण्याच्या अजिबात मुडमध्ये नाहीय. आता तर कंगनाने हृतिकचे वडील निर्माता-दिग्दर्शक राकेश रोशन यांच्यावर निशाणा साधलाय.

Updated: Oct 5, 2016, 06:20 PM IST
'43 वर्षांच्या मुलासाठी त्याच्या वडिलांना का उभं राहावं लागतं?' title=

मुंबई : अभिनेत्री कंगना रणावत हृतिक रोशनबरोबर सुरु असलेला कोल्ड वॉर विसरण्याच्या अजिबात मुडमध्ये नाहीय. आता तर कंगनाने हृतिकचे वडील निर्माता-दिग्दर्शक राकेश रोशन यांच्यावर निशाणा साधलाय.

कंगनाला हृतिक बरोबरचा कोल्डवॉर संपविण्याची इच्छा नाहीय. हृतिकच्या प्रत्येक वारावर कंगनानं पलटवार केलाय. हृतिक आणि कंगनामधील कायद्याची लढाई आता जरी शांत झाली असली तरी कंगना कोणत्याच कार्यक्रमात हृतिकवर शब्दांचा वार करणं सोडत नाही... जिथे संधी मिळेल तिथे कंगना हृतिकवर तोंडसुख घेत असते. 

चेतन भगतच्या 'वन इंडियन गर्ल' या नॉवेल लॉन्चच्या कार्यक्रमात पोहोचलेल्या कंगनाने हृतिकवर जबरदस्त टीका केली. राकेश रोशनने नुकतचं म्हटलं होतं की, हृतिकने जर उघडलं तर अनेक गोष्टी बाहेर येतील. याकडे कंगनाचं लक्ष वेधलं असता तिने सिनियर रोशनला पण सडेतोड उत्तर दिलं...

'पुरुषांना स्वत:साठी उभं राहता येत नाही... 43 वर्षांच्या मुलासाठी त्याच्या वडिलांना का उभं राहावा लागतं?' पर्सनल लाईफमधील नातेसंबंधांमध्ये यशस्वी झाल्यामुळेच मला बरचं काही गमवावं लागल्याचंही कंगनानं म्हटलंय. 

कंगना या कार्यक्रमादरम्यान बोलत सुटली होती आणि बिचारे चेतन भगत फक्त ऐकत होते. सध्या तर कंगना जिथे हातात येईल तिथे फक्त हृतिकवर तोंड सुख घेतांना दिसतेय. त्यामुळे कंगनाच्या या उत्तराला हृतिक काय प्रत्युत्तर देतो हे बघणं आता उत्सुकतेचं ठरणार आहे.