मेरठ : आपल्या छोट्या भावाच्या पत्नीनेने केलेल्या आरोपामुळे सध्या चर्चेत असलेला अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी याने पाकिस्तानी कलाकारांबाबत सलमान खान विरोधी भूमिका घेतली आहे. सध्याच्या परिस्थिती पाकिस्तानी कलाकारांनी भारत सोडले पाहिजे.
नवाजुद्दीन सिद्दीकीने मेरठमध्ये घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत सांगितले की, माझ्यावर लावण्यात आलेले आरोप निराधार आहेत.
यावेळी तो म्हणाला की सध्याची स्थिती अशी आहे की, भारतात काम करत असलेल्या पाकिस्तानी कलाकारांनी भारत सोडून जायला हवे.
यापूर्वी सलमान खान याने पाकिस्तानी कलाकारांबद्दल म्हटले की ते दहशतवादी नाही, त्यांना भारत सरकारने व्हिसा दिला आहे. त्यामुळे त्यांना विरोध करणे चुकीचे आहे.
सलमान आणि नवाजुद्दीन यांची जवळीक आहे. सलमान खान याने नवाजुद्दीन याने अनेक चित्रपट मिळवून दिले आहेत. त्यामुळे आता सलमान विरोधात भूमिका घेतल्याने सर्वांनी भुवया उंचावल्या आहेत.