सर्वात जास्त मानधन घेणारी 'बॉलिवूडची क्वीन'

बॉलिवूडचा 'क्वीन' असल्याचं आता तर कंगना राणौतनं आपल्या कृतीतून सिद्ध करून दाखवलंय. 

Updated: Aug 18, 2015, 01:46 PM IST
सर्वात जास्त मानधन घेणारी 'बॉलिवूडची क्वीन' title=

नवी दिल्ली : बॉलिवूडचा 'क्वीन' असल्याचं आता तर कंगना राणौतनं आपल्या कृतीतून सिद्ध करून दाखवलंय. 

कंगना बॉलिवूडमध्ये सध्या ज्या स्थानावर आहे... ते तिनं खूप मेहनतीनं आणि कोणत्याही गॉड फादरशिवाय मिळवलंय.... यावर दुमत नाही. आता तर ती फिल्म इंडस्ट्रीमध्ये सर्वात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री ठरलीय. 

मिळालेल्या माहितीनुसार, कंगनाला तिच्या आगामी सिनेमासाठी तब्बल ११ करोडोंचा चेक मिळालाय. यामुळे, मानधनाच्या बाबतीत कंगनानं अभिनेत्री दीपिका पादूकोण आणि प्रियांका चोपडा यांनाही मागे टाकलंय. 

दीपिका एका सिनेमासाठी ८ ते ९ करोड रुपये मानधन म्हणून मिळवते... तर प्रियांका चोपडा ७ ते ८ करोड मानधन घेते. पण, आपल्या अभिनयाची छाप पाडत महिला केंद्रस्थानी असलेल्या चित्रपटांना प्राधान्य देत, किंवा त्या चित्रपटांनाच आपल्या टॅलेंटनं खेचून घेत प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवणाऱ्या कंगनानं स्वत:ला आजवर वारंवार सिद्ध केलंय. 

आपला हक्क मिळवण्यासाठी आपल्याला त्या लायक बनावं लागेल, असं नुकतंच प्रियांका चोपडानं आपल्या एका मुलाखतीत म्हटलं होतं. तेच कदाचित कंगना आपल्या कृतीतून करून दाखवतेय, असं म्हटलं तर वावगं ठरायला नको.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.