बँकॉकमध्ये बॉम्बस्फोटवेळी जेनेलिया होती रस्त्याच्या पलिकडे

अभिनेत्री जेनेलिया डिसूजानं ट्विटरवरून आपण स्फोट झाला त्याच्या जवळच होतो. आम्ही सुखरूप आहोत, पण हे पाहून दुखी असल्याचं जेनेलिया म्हणते. 

Updated: Aug 18, 2015, 03:58 PM IST
बँकॉकमध्ये बॉम्बस्फोटवेळी जेनेलिया होती रस्त्याच्या पलिकडे title=

बँकॉक :  सोमवारी बँकॉकमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात बॉलिवूड अभिनेत्री जेनेलिया देशमुख थोडक्यात वाचली. जेनेलियाने ट्विटरवर आपल्या फॉलोअर्सला आपण सुरक्षित असल्याचा मेसेज दिला आहे. ती म्हणाली आम्ही सुरक्षित आहोत. 

 

 

यापूर्वी जेनेलियाने ट्वीट करून सांगितले होती की, बॉम्ब स्फोट झाला त्यावेळी समोरच्या मॉलमध्ये मी उपस्थित होती. सायरनचा आवाज येत आहे. आम्ही सुरक्षित आहोत. पण या हल्ल्यात जे मारले गेले त्यांच्याबद्दल खूप दुःख वाटतं आहे. 

जेनेलिया एका जाहिरातीच्या शूटसाठी बँकॉकमध्ये गेली होती. जेनेलियासोबत तिचा पती आणि अभिनेता रितेश देशमुखही होता अशी बातमी समोर येत आहे. रितेशने आपण सुरक्षित असल्याचे ट्विट करत सांगितले की, या भ्याड हल्ल्यात अनेकांचे प्राण गेले याचे मला खूप दुःख वाटते. विरोध दर्शविण्यासाठी निरागस माणसांचे प्राण घेणे कसे योग्य असते असा प्रश्नही त्याने विचारला आहे. 

 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.