काजोलने बॉलिवूडच्या या खानसोबत काम करण्यास दिला नकार

बॉलिवूड अभिनेत्री काजोलने तिच्या अभिनयाने अनेकांची मन जिंकली. काजोलने बॉलिवूडमध्ये अनेक हिट सिनेमे दिले आहेत. किंग खान शाहरुख़सोबत काजोलची जोडी प्रेक्षकांना भावली. शाहरुख सोबतच काजोलने सलमान आणि आमीर सोबतही हिट सिनेमे केले आहेत. पण काजोलने आता मात्र बॉलिवूडच्या एका खान सोबत काम करण्यास नकार दिला आहे. 

Updated: Aug 19, 2016, 09:25 AM IST
काजोलने बॉलिवूडच्या या खानसोबत काम करण्यास दिला नकार title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री काजोलने तिच्या अभिनयाने अनेकांची मन जिंकली. काजोलने बॉलिवूडमध्ये अनेक हिट सिनेमे दिले आहेत. किंग खान शाहरुख़सोबत काजोलची जोडी प्रेक्षकांना भावली. शाहरुख सोबतच काजोलने सलमान आणि आमीर सोबतही हिट सिनेमे केले आहेत. पण काजोलने आता मात्र बॉलिवूडच्या एका खान सोबत काम करण्यास नकार दिला आहे. 

दबंग सलमान खान पुन्हा एकदा काजोलसोबत काम करु इच्छितो. पण काजोलने सलमान खानसोबत काम करण्यास नकार दिला आहे. दबंगच्या तिसऱ्या पार्टमध्ये काजोलने तशीच भूमिका करावी जशी तिने गुप्त सिनेमामध्ये केली होती अशी सलमानची इच्छा आहे. 

अरबाज़ खानने दबंग ३ मध्ये विलनच्या भूमिकेत काजोलला अॅप्रोच केलं पण काजोलने ही भूमिका करण्यास नकार दिला आहे. एका सिनेमामध्ये २ खान असू शकत नाहीत असं म्हणत तिने हा सिनेमा नाकारला आहे. या गोष्टीची मात्र त्यांच्याकडून पुष्टी झालेली नाही. 

दबंग ३ च्या अॅक्ट्रेससाठी सध्या खूपच चर्चा रंगल्या आहे. अरबाजने कागी दिवसांपूर्वीच हे जाहीर केलं होतं की सोनाक्षला अजूनही फायनल केलंल नाही. परिनिती चोपडाचं नाव देखील चर्चेत आहे. पण सध्या तरी काजोलने नकार दिल्याचं समजतंय.