मुंबई : सुपरस्टार काजोल हिला रस्त्यावर शॉपिंग करायला आवडते, हे तीने झी मराठीवरील सुप्रसिद्ध शो चला हवा येऊ द्यामध्ये गुपीत उघड केले. पण हे गुपीत उघड केल्यानंतर थुकरटवाडीतील बाप की अदालतचे सर्व कलाकार तिला अनेक रस्त्यावरील वस्तू विकू लागल्या.
श्रेया बुगडे ही बरखा दत्त झाली होती. तिने काजोलला विचारले तुम्हांला देशात परदेशात रस्त्यावरच्या वस्तू खरेदी करायला आवडतात का. काजोलने हो म्हटल्यावर पाहा तिला काय काय वस्तू विकल्या थुकरटवाडीच्या कलाकारांनी...
हा वस्तू पाहून काजोलला हसू आवरत नव्हते. काजोल लोटपोट झाली आणि अजय देवगण पण जबरदस्त हसत होता आणि एन्जॉय करत होता.