गायक सोनू निगमनं केली राधे माँ शी 'काली माँ'ची तुलना!

आपल्या भक्त असणाऱ्या एका कुटुंबावर दबाव टाकून त्यांना सुनेला हुंड्यासाठी छळण्याचा आदेश देणाऱ्या राधे माँबद्दल आता गायक सोनू निगमनं एक वादग्रस्त ट्विट केलंय.

Updated: Aug 17, 2015, 02:47 PM IST
गायक सोनू निगमनं केली राधे माँ शी 'काली माँ'ची तुलना! title=

नवी दिल्ली : आपल्या भक्त असणाऱ्या एका कुटुंबावर दबाव टाकून त्यांना सुनेला हुंड्यासाठी छळण्याचा आदेश देणाऱ्या राधे माँबद्दल आता गायक सोनू निगमनं एक वादग्रस्त ट्विट केलंय.

आपल्या ट्विटमध्ये सोनू निगमनं राधे माँवर केल्या गेलेल्या आरोपांवर चर्चा केलीय. आपल्या ट्विटमध्ये, कमी कपडे घालण्यावरून राधे माँ ला कोर्टात उभं करणं चुकीचं असल्याचं सोनू निगमनं म्हटलंय. 'जेव्हा पुरुष साधू नग्न फिरू शकतात... वेडेवाकडे चाळे करू शकतात, बलात्काराचे दोषी असल्यानं ते तुरुंगात जाऊ शकतात तर मग लैंगिक समानतेचा अधिकार इथं का दिला जात नाही. जर केस करायचीच असेल तर अशा लोकांवर करा ज्यांनी अशा लोकांना देवत्व प्रदान केलंय. महिला आणि पुरुषांसाठी वेग-वेगळे नियम योग्य नाहीत' असं सोनूनं ट्विटमध्ये म्हटलंय. 

हुंडा मिळवण्यासाठी आपल्याला आपल्याच कुटुंबीयांनी स्वयंघोषित देवी राधे माँ ऊर्फ सुखविंदर कौर हिच्या सांगण्यावरून छळ केल्याचा आरोप एका महिलेनं केलाय. यासंदर्भात पोलीस आरोपींना चौकशीसाठी बोलावू शकतात. या प्रकरणात राधे माँचा जबाब काही दिवसांपूर्वीच नोंदवण्यात आलाय. तर इतर आरोपींचेही जबाब गेल्या आठवड्यात नोंदवण्यात आलेत. 

दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयानं राधे माँ हिला जामीन दिलाय. हा जामीन तिला काही अटींवर मिळालाय. यामुळे, सुखविंदर कौर हिला दर बुधवारी कोर्टात हजेरी लावावी लागणार आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.