मुंबई : मुस्कुराने की वजह तुम हो... या गाण्याने करोडो संगीत रसिकांच्या हृदयात स्थान बनविलेला गायक अरिजीत सिंह याला अंडरवर्ल्डची धमकी आली आहे. अरिजीतने ओशिवारा पोलिस स्टेशन तक्रार दाखल केली आहे.
गँगस्टर रवि पुजारी यांच्या गँगने अरिजीतला फोनवरून धमकी दिल्याचे सांगण्यात येत आहे. त्याला पाच कोटी किंवा दोन शो फ्रीमध्ये करण्याची धमकी दिली आहे. अरिजीत आशिकी २ च्या क्योंकी तुम ही हो' या गाण्यानंतर सर्वांना परिचीत झाला.
अमेरिकेत शो पाहिजे पुजारीला
अमेरिकेत अरिजीत एक शो करणार होता. पण ऑर्गनाझरने शेवटच्या क्षणी त्याची कन्फर्मेशन दिली, त्यामुळे अरिजीतने शो करण्यास नकार दिला. अरिजीतने आरोप केला की रवी पुजारीच्या नावाने धमकी देणारा हा माणूस अमेरिकेत त्याच ऑर्गनाझरसाठी शो करण्यास सांगत आहे.
क्या आहे तक्रारीत?
अरिजीत सिंहने आपल्या तक्रारीत म्हटले की, एक व्यक्ती सतत माझ्या मॅनेजरला फोनवरून धमकी देत आहे. तसेच पाच कोटी रुपयांची मागणी करत आहे. पैसे नसल्याचे सांगितल्यावर रवि पुजारीसाठी फुकटात दोन शो करण्याची धमकी देत आहे.
अरिजीतने सुरूवातीला या धमकीकडे लक्ष दिले नाही. पण फोन कॉल्स वाढले, त्यानंतर त्याने तक्रार दाखल केली. या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.