इस्तंबूल स्फोट : अभिनेता हृतिक रोशन हल्ल्यातून बचावला

तुर्कीमधील इस्तंबूल शहरातील अतातुर्क विमानतळावर झालेल्या आत्मघाती हल्ल्यात ३६ ठार झालेत तर १४० पेक्षा जास्त लोक जखमी झालेत. या हल्ल्यातून अभिनेता हृतिक रोशन थोडक्यात बचावला आहे. 

Updated: Jun 29, 2016, 10:05 AM IST
इस्तंबूल स्फोट : अभिनेता हृतिक रोशन हल्ल्यातून बचावला title=

इस्तंबूल : तुर्कीमधील इस्तंबूल शहरातील अतातुर्क विमानतळावर झालेल्या आत्मघाती हल्ल्यात ३६ ठार झालेत तर १४० पेक्षा जास्त लोक जखमी झालेत. या हल्ल्यातून अभिनेता हृतिक रोशन थोडक्यात बचावला आहे. 

इस्लामिक स्टेटने (इसिस) हा हल्ला घडवून आणला आहे. तुर्कीच्या स्थानिक वेळेनुसार मंगळवारी संध्याकाळी हा हल्ला झाला. आत्मघाती हल्ल्यापूर्वी काही वेळ आगोदरच विमानळावरून इकॉनॉमी क्लासने भारतात परतल्याचे हृतिक रोशन म्हटले आहे. तसे त्याने ट्विट केले आहे.

हृतिक हा त्याची दोन मुले रेहान आणि रिधान यांच्यासह स्पेन आणि आफ्रिकेत सुट्टीसाठी गेला होता. तो इस्तंबूल विमानतळावरून भारतात परतला. हृतिकने या घटनेविषयी ट्विटरवरून ही माहिती दिली आहे.

हृतिकने ट्विट केलेय की, अतातुर्क विमानतळावर स्फोट होण्यापूर्वी काही वेळ मी विमानतळावरच होतो. या मोठ्या हल्ल्यातून मी थोडक्यात बचावलो. इस्तंबूलहून भारतात परतण्यासाठी मी विमानतळावर आलो होतो. पण, काही कारणांमुळे माझे कनेक्टिंग विमान चुकले. भारताकडे जाणारे अन्य विमान दुसऱ्या दिवशी असल्याने मी इकॉनॉमी क्लासने निघालो. त्यानंतर काही वेळातच हे आत्मघाती हल्ले झाले.