जेव्हा डॉक्टर अभिनेता रणवीर सिंहवर भडकले...

एप्रिलमध्ये हातावर झालेल्या शस्त्रक्रियेनंतर अभिनेता रणवीर सिंहला त्याच्या डॉक्टरांनी हाताची विशेष काळजी घेण्यास सांगितलं आहे. परंतु रणवीर आपल्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये इतका व्यस्त आहे की त्याला आपल्या दुखापतीची जरा सुद्धा काळजी नाही.

Updated: Jun 8, 2015, 01:19 PM IST
जेव्हा डॉक्टर अभिनेता रणवीर सिंहवर भडकले... title=

मुंबई : एप्रिलमध्ये हातावर झालेल्या शस्त्रक्रियेनंतर अभिनेता रणवीर सिंहला त्याच्या डॉक्टरांनी हाताची विशेष काळजी घेण्यास सांगितलं आहे. परंतु रणवीर आपल्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये इतका व्यस्त आहे की त्याला आपल्या दुखापतीची जरा सुद्धा काळजी नाही.

रणवीरच्या या बेजबाबदार वागण्याकडे पाहून त्याच्या डॉक्टरांनी त्याला सज्जड दम दिला आहे. रणवीरला एका इव्हेंटमध्ये हातावर पट्टी न लावता फिरतानाचा त्याच्या डॉक्टरांनी पाहिलं आणि त्यांनी रणवीरला रागवलं.

रणवीर सिंहला आता किमान २ महिने हातावर पट्टी बांधून फिरावं लागणार आहे, ज्यामुळं तो लवकर बरा होईल, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. तेव्हा रणवीरनं तब्येतीची काळजी घ्यावी, अशी त्याच्या फॅन्सचीही इच्छा आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.