'आयफा'मध्येही 'क्वीन' कंगनाचा जादू, शाहिद सर्वोत्कृष्ट अभिनेता

मलेशियामध्ये आयोजिक आंतरराष्ट्रीय भारतीय फिल्म अॅकॅडमी (IIFA)अॅवॉर्ड्स २०१५ची घोषणा करण्यात आलीय. क्वालालांपूर इथं बॉलिवूडची 'क्वीन' कंगणा राणावतनं सर्वांचं मन जिंकलंय. कंगणाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा अॅवॉर्ड मिळाला. तर 'हैदर'मधील दमदार अभिनयासाठी शाहीद कपूरला सर्वोत्कृष्ट अभिनेता पूरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. 

Updated: Jun 8, 2015, 10:29 AM IST
'आयफा'मध्येही 'क्वीन' कंगनाचा जादू, शाहिद सर्वोत्कृष्ट अभिनेता title=

मुंबई: मलेशियामध्ये आयोजिक आंतरराष्ट्रीय भारतीय फिल्म अॅकॅडमी (IIFA)अॅवॉर्ड्स २०१५ची घोषणा करण्यात आलीय. क्वालालांपूर इथं बॉलिवूडची 'क्वीन' कंगणा राणावतनं सर्वांचं मन जिंकलंय. कंगणाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा अॅवॉर्ड मिळाला. तर 'हैदर'मधील दमदार अभिनयासाठी शाहीद कपूरला सर्वोत्कृष्ट अभिनेता पूरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. 

कंगणा राणावत अभिनित क्वीन चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा अॅवॉर्ड मिळाला. तर आमिर खानच्या 'पीके'साठी राजकुमार हिरानी ठरले बेस्ट दिग्दर्शक... बेस्ट डेब्यू मेलसाठी टायगर श्रॉफनं बाजी मारली. तर वरुण धवनला बेस्ट अॅक्टर इन कॉमिक रोलचा IIFA अॅवॉर्ड मिळाला. 

IIFA अॅवॉर्ड २०१५ची संपूर्ण लिस्ट -

बेस्ट अॅक्टर इन निगेटिव्ह रोल - केके मेनन (हैदर) 

बेस्ट डेब्यू मेल- टायगर श्रॉफ (हीरोपंती)

बेस्ट डेब्यू फीमेल- कृति शैनन (हीरोपंती)
 
बेस्ट परफॉर्मेंस इन कॉमिक रोल- वरुण धवन (मैं तेरा हीरो)

लाइफटाइम अचिव्हमेंट अॅवॉर्ड- सुभाष घई (डायरेक्टर, प्रोड्यूसर)

बेस्ट अॅक्ट्रेस फीमेल सपोर्टिंग- तब्बू (हैदर)

बेस्ट अॅक्टर मेल सपोर्टिंग- रितेश देशमुख (एक विलेन)

बेस्ट अॅक्टर मेल- शाहिद कपूर (हैदर)

बेस्ट अॅक्टर फीमेल- कंगना राणावत (क्वीन)

बेस्ट फिल्म- क्वीन

बेस्ट डायरेक्टर- राजकुमार हीरानी (पीके)

वुमन ऑफ द इयर- दीपिका पादुकोण (हॅप्पी न्यू इयर, पीकू आणि फाइंडिंग फॅनी)

बेस्ट रिजनल फिल्म- लय भारी (मराठी)

बेस्ट मेल प्लेबॅक सिंगर- अंकित तिवारी (तेरी गलियां)

बेस्ट फीमेल प्लेबॅक सिंगर- कनिका कपूर (बेबी डॉल)

बेस्ट म्यूजिक डायरेकटर- शंकर-एहसान-लॉय (२ स्टेट्स)

बेस्ट स्टोरी- विकास बहल, चैतल्य परमार, परवेज शेख (क्वीन)

बेस्ट डेब्यू डायरेक्शन- साजिद नाडियाडवाला (किक), ओमंग कुमार (मैरी कॉम)

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.