'सैराट'मधील हैदराबादचे शूटिंगही तेथे झालेच नाही!

नागराज मंजुळे यांच्या 'सैराट'मधील हैदराबादचे शूटिंग हे हैदराबादमध्येच झालेच नाही.  

Updated: May 11, 2016, 11:20 PM IST
'सैराट'मधील हैदराबादचे शूटिंगही तेथे झालेच नाही! title=

मुंबई : नागराज मंजुळे यांच्या 'सैराट'मधील हैदराबादचे शूटिंग हे हैदराबादमध्येच झालेच नाही. ते सोलापूर आणि पुणे शहरातच झाले. तुम्हाला याची उत्सुकता असेल मग कोठे झाले?

येथे झाले खरे शूटिंग?

'सैराट'मध्ये हैदराबादची एक झोपडपट्टी दाखवण्यात आली आहे. मात्र, ही झोपडपट्टी पुण्यातील आहे. झोपडपट्टीमधील घराचे सीन्स पुण्यामधील पर्वतीच्या मागे असलेल्या जनता वसाहत झोपडपट्टीमध्ये शूट केले गेलेत. तर स्टेशनबाहेरील शूटिंग हे सोलापूरमध्ये झालेय, याचे सहस्य या सिनेमातील अभिनेत्री छाया कदम यांनी उलगडलेय.

असा आला शूटिंगमध्ये अडथळा...

साऊथ इंडियन पदार्थांच्या गाड्याचे शूटिंग सोलापूरमध्ये झालेय. पावसामुळेसुद्धा अनेकवेळा शूटिंगमध्ये व्यत्यय आला होता. मात्र सुरुवातीचा अडथळा वगळला, तर शूटिंग उत्तम आणि ठरलेल्या वेळेत झाले, अशी कबूली छाया कदम देतात. त्यांनी सांगितले, फँड्री सिनेमात एक रोल केलाय. 

मी प्रेमातच पडले...

दरम्यान,  फँड्री पिफमध्ये निवडला गेला होता, त्याचवेळी नागराजने सैराटविषयी विचारणा केली. मी त्याचा सिनेमा असल्याने होकार दिला. मला काय स्टोरी आहे हे माहीतही नव्हते. तहीही होकार दिला. ज्यावेळी सिनेमा करायची वेळ आली, त्यावेळी सिनेमाची थिम वाचली आणि मी भूमिकेच्या प्रेमातच पडले, असे छाया कदम सांगतात.