आलियासोबत काम करण्यास इम्राननं दिला नकार!

बॉलिवूडची जान आलिया भट्ट सध्या प्रत्येक दिग्दर्शकासाठी हॉट आणि फेव्हरेट अभिनेत्री ठरतेय. अनेक अभिनेतेही आलियासोबत काम करण्याची संधी शोधत आहेत... पण, एक अभिनेता असाही आहे ज्याला मात्र आलियासोबत काम करण्यात काडीचाही इंटरेस्ट नाही.

Updated: Apr 2, 2015, 09:08 AM IST
आलियासोबत काम करण्यास इम्राननं दिला नकार! title=

नवी दिल्ली : बॉलिवूडची जान आलिया भट्ट सध्या प्रत्येक दिग्दर्शकासाठी हॉट आणि फेव्हरेट अभिनेत्री ठरतेय. अनेक अभिनेतेही आलियासोबत काम करण्याची संधी शोधत आहेत... पण, एक अभिनेता असाही आहे ज्याला मात्र आलियासोबत काम करण्यात काडीचाही इंटरेस्ट नाही.

होय, आणि हा अभिनेता आहे इम्रान हाश्मी... इम्राननं आलियासोबत काम करण्यास चक्क नकार दिलाय. 

एका वेबसाईटनं दिलेल्या माहितीनुसार, इम्रानला आलियासोबत एका सिनेमाची ऑफर मिळाली होती. पण, आपल्या बहिणीसोबत रोमँटीक भूमिका निभावणं आपल्यासाठी शक्य नाही, असं सांगत इम्राननं या सिनेमाला नकार दिलाय. 

सोबतच, आलियाही इम्रानवर भलतीच नाराज झालीय... कारण, आलियाची डेब्यू फिल्म स्टुडंट ऑफ द इअर अजूनही इम्राननं पाहिलेला नाही.

आलियाचे वडील आणि दिग्दर्शक महेश भट्ट हे इम्रानचे मामा आहेत... आणि याच कारणामुळे आलिया आणि पूजा भट्ट इम्रानच्या बहिणी आहेत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.