मुंबई : नुकताच, दीपिकानं कतरिनाला रणबीरसोबत लग्न न करण्याचा दिलेला सल्ला तुम्हाला एव्हाना माहीत पडलाच असेल... अगदी याचं विरुद्ध टोक गाठत दीपिकानं आणखीन एक असंच सगळ्यांना चक्रावून टाकणारं वक्तव्य केलंय.
सध्या रणवीर सिंगसोबत डेटिंग करत असलेल्या दीपिकानं नुकत्याच मुंबईत झालेल्या एका अॅवॉर्ड फंक्शनमध्ये अभिनेत्री कतरीना कैफ हिला आपल्या एक्स बॉयफ्रेंडशी म्हणजेच रणबीर कपूरशी लग्न न करण्याचा सल्ला दिला होता.
पण, याच कार्यक्रमाच्या एका मजेशीर कार्यक्रमात जेव्हा दीपिकाला एक प्रश्न विचारण्यात आला होता. 'जर तुला कतरिना कैफ बनून नव्या वर्षाचा एखादा संकल्प करायचा असेल तर तो काय असेल?' असा डिंम्पीगर्लला जेव्हा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा तिनं झटकन उत्तर देऊन टाकलं... की 'रणबीरशी लग्न,...'
दीपिकानं बॉलिवूडमध्ये करिअर सुरू केलं तेव्हा रणबीर तिचा सगळ्यात चांगल्या मित्रांपैकी एक होता... त्यानंतर, त्यांचं अफेअरही सुरू झालं होतं... पण, अचानक काहीतरी बिनसलं आणि दोघांनी एकमेकांना 'मित्र' म्हणूनच ठेवणं पसंत केलं... आणि दीपिकाला त्याचा त्रासही झाला होता... पण, आता पुन्हा एकदा एका वेळी कतरीनाला 'रणबीरशी लग्न करू नको' आणि 'रणबीरशी लग्न करायचंय' अशी दोन सरळ-सरळ विरोधी वक्तव्यं करताना दीपिकाच्या मनात नेमकं चाललंय तरी काय? असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.