मला टीबी झाला होता, महानायकाची दिलखुलास कबुली

महानायक अमिताभ बच्चन यांनी आपल्याला केबीसीच्या आधी टीबी झाल्याची दिलखुलास कबुली दिली आहे. 

Updated: Dec 22, 2014, 09:16 PM IST
मला टीबी झाला होता, महानायकाची दिलखुलास कबुली title=

मुंबई : महानायक अमिताभ बच्चन यांनी आपल्याला केबीसीच्या आधी टीबी झाल्याची दिलखुलास कबुली दिली आहे. 

यावर बोलतांना बिग बी म्हणाले, मी स्वत: टीबी पासून त्रस्त होतो, मात्र वेळेत उपचार घेऊन टीबीवर मात केली, अशी कबुली पहिल्यांदाचं सार्वजनिक ठिकाणी दिली आहे. 

टीबी हारेगा, देश जितेगा या अभियानाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, बिग बी अमिताभ बच्चन उपस्थित होते. 

यावेळी बोलतानाच अमिताभ बच्चन यांनी उद्योजक आणि फिल्म इंडस्ट्रीमधल्या लोकांना झोपडपट्टी दत्तक घेण्याचं आवाहनही केलं आहे. त्यामुळं बिग बींच्या आवाहनाला उद्योजक आणि फिल्म स्टार मंडळी दाद देतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

मुंबई महापालिकेकडून अमिताभ बच्चन यांना मोहिमेचे ब्रॅन्ड अम्बेसिडर करण्यात आलं आहे. यावेळी बोलताना स्वत:ला टीबी झाल्याचं बिग बींनी कबूल केलं.
 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.