मुंबई : नुकताच ४२वा वाढदिवस साजरा केलेला अभिनेता ऋतिक रोशनला आगामी मोहंजोदडो या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दुखापत झालीये. शूटिंगदरम्यान ऋतिक पडल्याने त्याला ही दुखापत झालीये.
ऋतिकने ट्विटरद्वारे ही बातमी चाहत्यांना दिलीय. शनिवारी त्याला ही दुखापत झाली. डॉक्टरांनी त्याला दोन आठवड्यांची विश्रांती घेण्याचा सल्ला दिलाय.
मोहंजोदडो ही एक प्रेमकहाणी आहे. यामध्ये ऋतिक नवोदित अभिनेत्री पूजा हेगडेसह दिसणार आहे. याचे दिग्दर्शन आशुतोष गोवारीकर करतायत.
Had a lovely fall 2day.Tore a ligament. Curious bout hw Im going 2 hv a fun time healing n working next few weeks. #imagination #makeitwork
— Hrithik Roshan (@iHrithik) January 16, 2016