हृतिक खूप हॉट, त्यासोबत काम करण्याची इच्छा : पॅरिस हिल्टन

नुकतीच एक बातमी आली होती की, अभिनेता हृतिक रोशन याने दुबईत अमेरिकन सोशलिस्ट आणि अभिनेत्री पॅरिस हिल्टनसोबत पार्टी केली. सुप्रसिद्ध शेफ ग्रेग मॅलोफ यांच्या नव्या रेस्तराँ क्लेत दुबईमध्ये व्हीआयपींसाठी आयोजित लंचमध्ये हृतिक आला होता. 

Updated: Oct 17, 2014, 06:28 PM IST
हृतिक खूप हॉट, त्यासोबत काम करण्याची इच्छा : पॅरिस हिल्टन

नवी दिल्ली : नुकतीच एक बातमी आली होती की, अभिनेता हृतिक रोशन याने दुबईत अमेरिकन सोशलिस्ट आणि अभिनेत्री पॅरिस हिल्टनसोबत पार्टी केली. सुप्रसिद्ध शेफ ग्रेग मॅलोफ यांच्या नव्या रेस्तराँ क्लेत दुबईमध्ये व्हीआयपींसाठी आयोजित लंचमध्ये हृतिक आला होता. 

यानंतर हॉलिवूड डॉट टीव्ही नावाच्या ऑनलाइन पोर्टलने हृतिक रोशन आणि पॅरिस हिल्टनचा एक फोटो ट्वीट केला होता. त्यावेळी हिल्टनला विचारले की, तू बॉलिवूडच्या चित्रपटात हृतिक सोबत काम करणार का?
त्यावर उत्तर देताना हिल्टनने ट्वीट करताना, सांगितले की, हा का नाही, हृतिक खूप हॉट (आकर्षक) आहे. 

यापूर्वी झालेल्या भेटीचा फोटो पॅरिसने ट्विटरवर ट्विट केला होता. या फोटोसह हिल्टनने लिहिले होते की, हृतिक रोशनसह दुबईत खूप छान वाटले, खूप चांगला रेस्तराँ आहे. दुबई माझे नवे आवडते शहर आहे. 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

 

 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x