पाहा : 'पीके'च्या पोस्टरवर आता अनुष्का 'ट्रान्झिस्टर'सहीत!

 २०१४ या वर्षातली सर्वात चर्चेत राहिलेला सिनेमा कोणता तर तो ‘पीके’ असावा, अशीच काहीशी इच्छा आमिर खानची दिसतेय... या सिनेमाचं चौथं मोशन पोस्टर नुकतंच प्रदर्शित करण्यात आलंय. 

Updated: Oct 17, 2014, 11:16 AM IST
पाहा : 'पीके'च्या पोस्टरवर आता अनुष्का 'ट्रान्झिस्टर'सहीत! title=

 

मुंबई : २०१४ या वर्षातली सर्वात चर्चेत राहिलेला सिनेमा कोणता तर तो ‘पीके’ असावा, अशीच काहीशी इच्छा आमिर खानची दिसतेय... या सिनेमाचं चौथं मोशन पोस्टर नुकतंच प्रदर्शित करण्यात आलंय.

आमिर खानचा एक ट्रान्झिस्टरसहीत आणि एक ट्रान्झिस्टरशिवाय प्रदर्शित झालेल्या पहिल्या दोन पोस्टर्सनं चांगलाच धुमाकूळ घातला होता. त्यानंतर, याच सिनेमाच्या तिसऱ्या पोस्टरवर संजय दत्त दिसला... आणि आता प्रदर्शित झालंय या सिनेमाचं चौथं पोस्टर... या पोस्टरवरही अनुष्का ‘ट्रान्झिस्टर’सहीत दिसतेय... होय... खुद्द आमिरनंही तसंच ट्विट केलं होतं. आता, ती नक्की दिसतेय... ते तुम्हीच पाहा...

हे पोस्टर प्रदर्शित करण्याआधी आमिरनंही एक वातावरण तयार केलं होतं. त्यामुळे, प्रेक्षकांची आणि अनुष्काच्या फॅन्सचीही उत्सुकता बरीच ताणली गेली होती.

राजकुमार हिरानंदानी दिग्दर्शक ‘पीके’ हा सिनेमा १९ डिसेंबर रोजी मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.