जेव्हा एका व्यक्तीनं पकडला हृतिक रोशनचा गळा

हृतिक रोशननं आपल्या ‘बँग बँग’च्या प्रमोशनसाठी शाहरुख आणि आमिरपासून रणवीर सिंह, प्रियंका चोप्रा, नरगिस फाकरी आणि फरहान अख्तर अशा अनेक सेलिब्रिटीजना क्रिएटिव्ह चॅलेंज दिले आहेत. पण त्याला कधी हे वाटलं नसेल की तो स्वत: एखाद्या ‘ड़ेअर’ला बळी पडेल. 

Updated: Oct 2, 2014, 07:10 PM IST
जेव्हा एका व्यक्तीनं पकडला हृतिक रोशनचा गळा title=

मुंबई: हृतिक रोशननं आपल्या ‘बँग बँग’च्या प्रमोशनसाठी शाहरुख आणि आमिरपासून रणवीर सिंह, प्रियंका चोप्रा, नरगिस फाकरी आणि फरहान अख्तर अशा अनेक सेलिब्रिटीजना क्रिएटिव्ह चॅलेंज दिले आहेत. पण त्याला कधी हे वाटलं नसेल की तो स्वत: एखाद्या ‘ड़ेअर’ला बळी पडेल. 

१ ऑक्टोबरला संध्याकाळी त्याच्या ग्रुपच्या एका मेंबरनं कार्यक्रम ठेवला होता. त्या ग्रुपच्या एका मुलाला हृतिकला जावून भेटायचं चॅलेंज दिलं गेलं. हा किस्सा मुंबईतील पीव्हीआर जुहूच्या पार्किंग लॉटमध्ये रात्री जवळपास ११.३० ते १२ दरम्यान घडली. हृतिक तिथं ‘बँग बँग’चं स्पेशल स्क्रीनिंग पाहायला पोहोचले होते. अचानक नवरात्रीचं पारंपरिक कपडे घालून एक मुलगा हृतिकच्या मागून आला आणि त्यानं अचानक हृतिकचा गळा धरला. सर्व काही इतकं अचानक घडलं की हृतिकचा बॉडीगार्ड मयूरही काही करू शकला नाही.  

खूप परिश्रमानंतर हृतिकच्या बॉडीगार्डनं त्याला त्या मुलाच्या ताब्यातून सोडवलं. या कृत्यासाठी त्या मुलाला मारही खावा लागला. नंतर हृतिकच त्या मुलाच्या मदतीला आला आणि बॉडीगार्ड मयूरला त्या मुलाला सोडायला सांगितलं. हृतिक म्हणाला, कधी कधी फॅन्सला आपलं प्रेम दाखविण्यासाठी विविध फंडे वापरतात. पण त्यामुळं पब्लिक प्लेसमध्ये प्रॉब्लेम होतो.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.