मुंबई : टॅक्स भरण्याच्या बाबतीत अभिनेता हृतिक रोशन यानं अक्षय कुमार आणि बॉलिवूडच्या तिनही खानांना मागे टाकलंय.
2016-17 या वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत 80 करोड रुपयांचा अॅडव्हान्स टॅक्स जमा केलाय. याचसोबत त्यानं सर्वात जास्त अॅडव्हान्स टॅक्स भरणाऱ्यांच्या लिस्टमध्ये पहिला क्रमांक पटकावलाय.
उल्लेखनीय म्हणजे, गेल्या वर्षीही हृतिकनं 50 करोड रुपयांचा टॅक्स भरला होता.
टॅक्स भरण्याच्या बाबतीत अभिनेता आमिर खान दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानं या तिमाहीत 72 करोड रुपयांचा टॅक्स जमा केलाय.
या लिस्टमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे रणबीर कपूर... त्यानं 37 करोड रुपयांचा अॅडव्हान्स टॅक्स भरलाय.
अॅडव्हान्स टॅक्सच्या बाबतीत सलमान खान चौथ्या क्रमांकावर आहे. त्यानं तिसऱ्या तिमाहीत 14 करोड रुपयांचा टॅक्स जमा केलाय.
तर अभिनेत्रींमध्ये दीपिका पादूकोन हिनं सर्वात जास्त अॅडव्हान्स टॅक्स भरलाय. दीपिकानं तीन करोड रुपयांचा टॅक्स जमा केलाय... तर करीना कपूर खान हिनं 70 लाखांचा अॅडव्हान्स टॅक्स भरलाय.