राधिका आपटेची हॉलिवूड एन्ट्री, दिले न्यूड सीन्स

हिंदी चित्रपटातून आपल्या कारकिर्दीला सुरूवात करणारी अभिनेत्री राधिका आपटे लवकरच एका हॉलिवूड सिनेमात झळकणार असून या चित्रपटात तिने चक्क काही न्यूड सीन्सही दिले आहे. पण नेमका कोणता चित्रपट आहे हे अजून तिने जाहीर केले नाही. 

Updated: Mar 17, 2015, 01:48 PM IST
राधिका आपटेची हॉलिवूड एन्ट्री, दिले न्यूड सीन्स title=

मुंबई : हिंदी चित्रपटातून आपल्या कारकिर्दीला सुरूवात करणारी अभिनेत्री राधिका आपटे लवकरच एका हॉलिवूड सिनेमात झळकणार असून या चित्रपटात तिने चक्क काही न्यूड सीन्सही दिले आहे. पण नेमका कोणता चित्रपट आहे हे अजून तिने जाहीर केले नाही. 

 
हॉलिवूडच्या या चित्रपटाचे चित्रिकरण झाले असून त्याच्यावर संस्कार होणे बाकी आहे. ज्या वेळी तो पोस्ट प्रॉडक्शनला येईल तेव्हा मी नाव उघड करेल असे राधिकाने सांगितले आहे. 
खुल्या विचारांची असल्याने भूमिकेची गरज असल्यास न्यूड सीन्स करण्यास माझी काहीच हरकत नाही, असं राधिकाने दिलखुलासपणे सांगितले. 

नुकतेच सोशल मीडियावर राधिका सारख्या दिसणाऱ्या महिलेचे अंघोळ करतानाचे न्यूड फोटो व्हायरल झाले होते. पण त्यावर राधिकाने ती मी नव्हे असे सांगितले होते. पण आता ती स्वतः न्यूड सीन देणार म्हटल्यावर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 
 
ब्रिटीश संगीतकार बेनेडिक्ट टेलर याच्याशी विवाह करण्यापूर्वी राधिका त्याच्यासोबतच लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती.  त्यानंतर राधिका आणि बेनेडिक्ट 2012 मध्ये विवाहबद्ध झालेत.
 
राधिकाने बॉलिवूडमध्ये अनेक सिनेमात काम केलं आहे. राधिका आपटे आपल्याला रितेश देशमुख यांच्या 'लई भारी' या चित्रपटात दिसली होती.  'हंटर' हा तिचा अॅडल्ट मूव्ही २० मार्च रोजी प्रदर्शित होत आहे. त्यातही तिने एका बोल्ड मुलीची व्यक्तीरेखा साकारली आहे. 

'एक्स', 'द ब्राईट डे', 'कौन कितने पानी में' आणि 'द फिल्ड' हे राधिकाचे अपकमिंग चित्रपट आहेत. फक्त हिंदीच नाही तर 'उला' या तामिळ आणि 'लायन' या तेलुगू सिनेमात राधिका दिसणार आहे. ती नुकतीच 'बदलापूर' या सिनेमात दिसली होती.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.