मुंबई : सेन्सॉर बोर्डानं जाहीर केलेल्या आपत्तीकारक शब्दांविरुद्ध आता बॉलिवूडकर एकवटलेत. यामध्ये, आमिर खान, दीपिका पादूकोण, मुकेश भट्ट यांच्यासोबत बॉलिवूडच्या अनेक हस्तींनी सेन्सॉर बोर्डाच्या मनमानी कारभार पद्धतीवर आक्षेप नोंदवलाय.
बॉलिवूडच्या अनेक मान्यवरांनी एकत्र येऊन हा मुद्दा सूचना तसंच प्रसारण राज्य मंत्री राज्यवर्धन राठोड यांच्यासमोर मांडला. प्रदीर्घ काळ चाललेल्या या बैठकीत केंद्रीय सिने सर्टिफिकेशन मंडळाचे प्रमुख पहलाज निहलानी यांच्याद्वारे २८ आपत्तीकारक शब्दांना बॅन करणारी एक यादी जाहीर केली होती. अनेकांच्या विरोधानंतर या यादीची अंमलबजावणी रोखण्यात आली.
'सेन्सॉर बोर्डानं दिलेल्या शब्दांच्या यादीमुळे निर्माण झालेल्या अनेक मुद्द्यांवर विचारविमर्श करण्यासाठी आम्ही राठोड यांची भेट घेतली... शब्दांना बॅन करणं ही गोष्ट आता खूप जुनी झालीय. यामुळे, आपण पुन्हा मागे फिरतोय, ही भावना आम्ही त्यांच्यासमोर व्यक्त केली' असं भट्ट यांनी म्हटलंय.
ही बैठक निहलामी यांना हटवण्यासंबंधीत असल्याचं म्हटलं जात होतं... परंतु, निहलानी यांना हटवण्यासंबंधात आमचं कोणतंही बोलणं झालं नसल्याचं भट्ट यांनी म्हटलंय.
करण जोहर, विशाल भारद्वाज, अनुराग कश्यप, रमेश सिप्पी, गुलजार, विद्या बालन असे अनेक हस्ती या बैठकीसाठी हजर होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.